Ad will apear here
Next
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी


मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
नंदू भेंडे
२७ नोव्हेंबर १९५६ रोजी नंदू भेंडे यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव सदानंद भेंडे. ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे. रॉक आणि पॉप म्हणजे फक्त इंग्रजी गाणी असेच समीकरण १९८० दशकापर्यंत कायम होते, ते नंदू भेंडे यांनीच तोडले आणि ते मराठीतले पहिले पॉपगायक ठरले. 
मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे आणि आशा भेंडे यांचा नंदू हा मुलगा. त्यांचे मामा कवी निस्सीम इझिकेल. रॉक पहिल्यांदा मुंबईतच ऐकल्याची आठवण नंदू यांनी लिहिली आहे. सुगम आणि शास्त्रीय संगीताची आवड त्यांना होती, पण नव्याचे स्वागत करण्याची ऊर्मीही होती. त्यातून आधी अॅलेक पदमसींच्या ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ या नाटकात ज्युडासची भूमिका (१९७४), मग ‘पुलं’च्या ‘तीन पैशांचा तमाशा’ या रूपांतरित संगीतिकेत ‘अंकुश’ची भूमिका केली; मात्र ‘व्हेलवेट फॉग’, ‘सॅव्हेज एन्काउंटर’, ‘ऑटोमॅटिक फॉरेस्ट’ आदी बँडमधून गाणारा तरुण हीच नंदू यांची ओळख राहिली. 

‘गेलो होतो रानात’सारख्या मराठी गाण्यांना त्या वेळच्या दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळाली. मग ‘डिस्को डान्सर’ या हिंदी चित्रपटासाठीही पार्श्वगायन केल्यावर बाप्पी लाहिरींखेरीज चित्रपटसंगीतातही आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा प्रख्यात संगीतकारांसह त्यांनी काम केले. नंतरच्या काळात ‘चमत्कार’, ‘चंद्रकांता’, ‘जीना इसी का नाम है’, ‘दायरे’ आदी मालिकांना संगीत देण्याबरोबरच, १९८७ साली स्वत:ची ‘म्युझिक सॉफ्टवेअर’ या नावाची संगीत-निर्मिती कंपनी आणि १९९२च्या नोव्हेंबरमध्ये ‘स्पेक्ट्रम मल्टिमीडिया’ ही कंपनी त्यांनी स्थापली. यापैकी स्पेक्ट्रमने एफएम रेडिओसाठी मराठी आणि कोंकणी भाषेत कार्यक्रम-निर्मिती केली. 

हा गायनेतर व्याप इतका वाढला, की १९९८च्या मे महिन्यात ‘इन सिंक स्टुडिओ’ हा ३२ ट्रॅक रेकॉर्डिंगची सोय असलेला स्टुडिओच त्यांनी स्थापला. त्याचीही अल्पावधीत भरभराट होऊन वर्षभराच्या आत या स्टुडिओत ६४-ट्रॅक रेकॉर्डिंगची सोय झाली. नंदू भेंडे यांना केवळ सुरांचे नव्हे, सुरांमागच्या तंत्राचेही आकर्षण होते. संगणकीय संगीताच्या जमान्याशी त्यांनी सहज जुळवून घेतले, ते याचमुळे. इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे क्षेत्रात त्यांनी हातपाय पसरून पाहिले व तेथेच राहणे त्यांना कठीण नव्हते. परंतु तरुणांना आवाज आणि संगीत-तंत्र यांचे शिक्षण देण्यात ते अधिक रमले होते. नंदू भेंडे यांचे निधन ११ एप्रिल २०१४ रोजी झाले.
.........


जेम्स पार्किन्सन
११ एप्रिल १७५५ रोजी जेम्स पार्किन्सन यांचा जनम झाला. १८१७ साली त्यांनी कंपवात ही स्थिती लोकांच्या प्रथम नजरेस आणून दिली. त्या आजाराला पुढे त्यांचेच नाव देण्यात आले. त्यामुळे तो आता पार्किन्सन्स डिसीज म्हणून ओळखला जातो.

मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो, त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश होत जातो, ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसलेली असताना तिचे धड पुढे कललेले दिसते. पार्किन्सन हा असा आजार आहे ज्यात मेंदूतील चेतापेशी मरतात व सुरुवातीला हा आजार हालचालींवर परिणाम करतो व नंतर शरीरात कंप निर्माण होतो. 

मेंदूमधील चेतापेशींद्वारा डोपामाइन नावाचे रसायन पुरेसे निर्माण होत नाही तेव्हा हा आजार होतो. हा आजार होण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आढळून आले आहे.

जेम्स पार्किन्सन यांचे निधन २१ डिसेंबर १८२४ रोजी झाले.
.....


शुभांगी अत्रे-पुरी
११ एप्रिल १९८१ रोजी भोपाळ येथे शुभांगी अत्रेचा जन्म झाला. ‘अंगूरी भाभी’ नावाने टीव्ही जगतात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे आपल्या ‘देसी लूक’साठी प्रसिद्ध आहे. शुभांगीचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करत होते. नोकरीतील बदल्यांमुळे ते इंदूरच्या आसपास अनेक ठिकाणी राहत होते. या कारणास्तव, शुभांगीच्या बालपणीचा काही काळ खरगोन जिल्ह्यातील सनावदमध्ये गेला. शुभांगी अत्रेचे शिक्षण इंदूरच्या होळकर विज्ञान महाविद्यालयात एमबीएपर्यंत झाले. 

लहानपणापासूनच शुभांगीला अभिनय आणि नृत्यात रस होता. ती कथक शिकली आहे. शुभांगीने मॉडलिंगने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. शुभांगीने ‘कस्तुरी’, ‘चिड़िया घर’, दो हंसों का जोड़ा, हवन, अधूरी कहानी हमारी, ‘भाभीजी घर पर है’ यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे. शुभांगीने पीयूष पुरी यांच्यासोबत लग्न केले आहे.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
...........
जुन्या काळातील अभिनेत्री अमिता यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

ख्यातनाम गायक कुंदनलाल सैगल यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUYCL
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language